जावली तालुक्यातील अबोली ढाब्यावरील दारू अड्ड्यावर छापा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
जावळी तालुक्यातील कुडाळ येथील अबोली धाब्यावरील दारू अड्ड्यावर मेढा पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात 70 हजार 165 रुपयाचा दारू मुद्देमाल जप्त केला. यामध्ये अबोली ढाब्याचा मालक दीपक वारागडे (वय- 48) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबोली ढाब्यावर अवैद्य दारू विक्री होत असतानाची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून रात्री उशिरा साडे दहा वाजण्याच्या सुमारास मेढा पोलिसांनी सापळा लावून छापा टाकला. यामध्ये 70 हजार 165 रुपयांची दारू देशी- विदेशी बाटल्या जप्त केल्या.

दीपक वारागडे याच्यावर अवैध दारू विक्रीचे अनेक गुन्हे पोलिस ठाण्यात दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तरीही पुन्हा तो दारू विक्री करत असतानाची माहिती मिळताच पोलिसांनी या दारू अड्ड्यावर छापा टाकला आहे. जावळीत कोणीही अवैध दारू विक्री करत असल्यास थेट पोलिसांची संपर्क साधावा, असे मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी आवाहन केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास अमोल माने करत आहेत.