कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोना विषाणूमुळे सरकारने पुकारलेल्या लॉकडाऊनचा सर्वधिक फटका ऊसतोड मजुरांना बसला आहे. अस्मानी आणि सुलतानी दोन्हीही संकटांचा सामना हे ऊसतोड मजूर करत आहेत. रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात विजेच्या कडकडाटासह तुफान पाऊस झालाय. या मुसळधार पावसामुळे शिरोळ मधील दत्त सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोड कामगारांच्या 100 हून अधिक झोपड्या उध्वस्त झाल्या आहेत. तर 1000 पेक्षा अधिक ऊस तोड कामगार उभ्या पावसात भिजत आहेत. लहान मुलांबाळासह जनावरेही उभ्या पावसात भिजत असून ते मदतीच्या प्रतीक्षा आहेत.
गेल्या तीन आठवड्या पासून लॉकडाऊन आणि आता पावसाने संसार उद्ध्वस्त केल्याने महिलांना अश्रू अनावर झालेत. या परिसरात 5000 लहान मोठी जनावरे आणि चार हजार ऊसतोड कामगार असून ऊसतोड कामगारांचे नेते म्हणवणारे मंत्री धनंजय मुंडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी यांना ऊसतोड मजुरांनी आर्त हाक दिली आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत बीड ला घेऊन जावा अशी विनवणी त्यांनी केली आहे. तर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी ऊसतोड कामगारांची गंभीर दखल घेत सरकार यासंदर्भात गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. ऊसतोड कामगारांना कोल्हापुरातून बीडला परत पाठ्वण्यासाठी आपण स्वतः माझी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली असल्याचे त्यांनी सांगितले
गेल्या आठवडाभरापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सायंकाळनंतर जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस कोसळत आहे याचा फटका यापूर्वीदेखील ऊसतोड कामगारांना बसला आहे मात्र रात्री झालेल्या या पावसाने तर कहरच केला आणि या ऊसतोड कामगारांचा संसार अक्षरशः या पावसाने जमीनदोस्त केला आतातरी सरकारने ऊसतोड कामगार यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”