हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवजयंतीनिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते साकीनाका येथे मनसे शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी महत्वाचे विधान केले. “मी हारतुरे घालायला आलो नाही. आज शिवजयंती आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवजयंती तिथीने साजरी करते. याचा अर्थ आज शिवजयंती साजरी करायची असे नाही. आपल्या छत्रपतींचा जयजयकार आणि जयंती 365 दिवस साजरी केली पाहिजे .मनसे म्हणून आपण शिवजयंती साजरी करतो,” असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शिवजयंतीनिमित्त मुंबईतील साकीनाका येथे मनसेच्या शाखेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यासपीठावर येऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की, आजही शिवजयंती सर्वत्र साजरी केली जाते. आपल्या शिवाजी महाराजांची जयंती 365 दिवस साजरी व्हावी, अशी आम्ही मागणी आहे. महाराजांची जयंती आजही साजरी केली तरी काही हरकत नाही. तिथीनं का साजरी करावी याचे कारण आपल्याकडे जेवढे सण येतात हे सर्व तिथीने साजरे करतो.

आपल्याकडील इतर सणही आपण तिथीने साजरे करतो, दिवाळी आणि गणपती वेगवेगळ्या दिवशी साजरी करतो. महापुरुषांचा जन्मदिवस हा आपल्यासाठी सण, तिथी प्रमाणेच आहे. त्यामुळे जल्लोषात शिवजयंती साजरी करुयात, असे ठाकरे यांनी सांगितले.