राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये तासभर खलबतं

raj thackeray fadanvis
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. आज सकाळी ही भेट झाली असून दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन सदिच्छ भेट दिली होती. आता शिवतीर्थावर पहिल्यांदाच गणपती बसणार असून त्याच पार्श्वभूमीवर फडणवीसांना गणपती दर्शनाचे निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरेंनी त्यांची भेट घेतल्याची शक्यता आहे. परंतु जेव्हा दोन मोठे राजकीय नेते भेटतात तेव्हा त्यांच्यात राजकीय चर्चा तर होतेच त्यामुळे या भेटीने चर्चाना उधाण आले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि भाजपमध्ये जवळीक वाढलेली आहे. मशीदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करून राज ठाकरेंनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला कात्रीत पकडलं होत. त्यानंतरच्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतही मनसेचे एकमेव मत भाजपच्या बाजूने गेलं होत. त्यातच आता मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर असल्याने राज ठाकरे- फडणवीस भेटीची जोरदार चर्चा सुरु आहे.