हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मशिदींवरुन भोंगे काढण्याबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी इशारा देताच राज्यासह देशभरात वातावरण चांगलेच तापले. अशात राज ठाकरेंच्या या भोंग्याच्या भूमिकेचे समर्थन करत उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकारने धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे राज ठाकरेंनी ट्विट करत कौतुक केले आहे. तर ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. “आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.
राज ठाकरेंनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले असून त्यांनी अजान आणि लाऊडस्पीकर हे दोन हॅशटॅग दिले आहेत. त्याबरोबर त्यांनी अभिनंदनाचे पत्र मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत ट्वीट केले आहे. त्यांनी त्यात म्हंटले आहे की, उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मनपूर्वक अभिनंदन व आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी आहेत. महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असे राज ठाकरे यांनी म्हंटले आहे.
#Azaan #Loudspeakers pic.twitter.com/Z6sCSPwJdK
— Raj Thackeray (@RajThackeray) April 28, 2022
आता राज ठाकरे यांच्या ट्विटनंतर त्यांच्या ट्विटला ठाकरे सरकारकडून काय उत्तर दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरे यांनी राज्य सरकारला भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे.