कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही ; राजू शेट्टींचा मोदी सरकारला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी हे दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले हे काळे कायदे सरकारने मागे घेतल्याशिवाय आम्ही हटणार नाही, अशी भूमिका यावेळी राजू शेट्टी यांनी मांडली

आता चर्चेच्या फेऱ्या थांबवून ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचं राजू शेट्टी यांनी ठणकावून सांगितलं. याचवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या संयमाचं कौतुक केलं. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने शेतकरी आंदोलन करत आहेत. आंदोलन कसं करायचं हे शेतकऱ्यांकडून शिकण्यासारखं आहे, असं ते म्हणाले.

“जो नियम उसाला तोच नियम बाकी पीकांना असायला हवा, अशी तरतूद करणारा कायदा करा. मी स्वत: यासंबंधीचं खाजगी विधेयक 2018 साली खासदार असताना मांडलं होतं. त्या विधेयकाला अनेक खासदारांनी पाठिंबा दिला होता. तेच विधेयक सरकारी विधेयक पाठिंबा म्हणून मांडावं”, अशी मागणी राजू शेट्टी यांनी यावेळी केली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment