Monday, January 30, 2023

जयंतराव, लाळघोटेपणाची पण हद्द झाली – भाजप नेत्याची खोचक टीका

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा काल 80 वा वाढदिवस होता. देशभरातून शरद पवार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव झाला. दरम्यान, शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल जयंत पाटील यांनी ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. हा महाराष्ट्र ज्यांच्यामुळे घडला, वाढला, समृद्ध झाला, सुजलाम-सुफलाम झाला अशा निवडक लोकांची नावं काढली तर त्यात अर्थात छत्रपती शिवाजी महाराज येतात. फुले, शाहू, आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण यांचे स्थान आहे. आज त्या पंगतीत आपले नेते शरद पवार साहेबसुद्धा आहेत. असं ट्विट जयंत पाटील यांनी केलं होतं.

जयंत पाटील यांच्या या ट्विटनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत जयंत पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. जयंतराव, लाळघोटेपणाची हद्द झाली, आपल्या नेत्याची स्तुती करताना राष्ट्र पुरुषांचा अपमान होणार नाही एवढी तरी काळजी घ्या… असं ट्विट त्यांनी केलं आहे.

- Advertisement -

दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत आपण सर्वांनी शरद पवार नावाचा करिष्मा बघितला आहे. स्वतःला देशाचे मालक समजणाऱ्या लोकांचा ‘बाप आला‘ असे म्हणत लोकांनी साहेबांचे राज्यभर स्वागत केले, त्यांचे नेतृत्व स्वीकारले. ‘शरद पवार जी कि राजनीती का दौर अब शुरू हुआ है’ हे विरोधकांनी जाणावे, असा इशाराही जयंत पाटील यांनी काल दिला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’