कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
20-20 लोकांचा बळी घेऊन स्वतःच प्रेझेंटेशन करणार्या शिंदे-फडणवीस सरकारकडून काय अपेक्षा करणार आहोत. स्वतःची टिमकी वाजवण्याकरिता 20 ते 30 श्री सदस्यांचा जीव घेणार्यांना सामान्यांच्या व्यथा, वेदताना काय समजणार? राज्यात ज्वलंत प्रश्नांपेक्षा खोक्यांची, फडतुस अन् काडतुसांची चर्चा आहे, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.
कराड येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की, ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच राज्य सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान अर्थात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांचाही या पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/1090996654989712
या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी उष्माघातामुळे अनेक जण चक्कर येऊन खाली पडले. तर अनेक जणांना उलटीही झाली. यामध्ये सुमारे 20 हुन अधिक लोकांचे जीव गेले. येथील घटनेमुळे विरोधकांकडून राज्य सरकारवर निशाणा साधण्यात आला. तर विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी देखील सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे पत्र दिले. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.