येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

Raju Shetty
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी अनेक मुद्यांवरून आघाडी सरकारवर टीकाही केली. आता राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे – फडणवीसांचे सरकार अस्तित्वात आले आहे. येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. यात भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होऊ लागल्याने राजू शेट्टी यांनी याबाबत मोठं विधान केले आहे. आम्ही या निवडणूक स्वबळावर लढवणार असून भाजपसोबत जाणार नाही, “असे शेट्टी यांनी म्हंटले आहे.

माळशिरस तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संपर्क कार्यालयाचे राजू शेट्टी यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आमच्या संघटनेत पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली आहे. सध्या विधानसभेची स्थिती पालिकेसारखी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारमध्ये लोकशाही राहिली नाही याच्या वेदना आम्हाला होतात त्यामुळे मी येत्या निवडणुकांत कोणत्याच पक्षांशी युती करणार नाही. तसेच विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कधीच भाजपशी युती करणार नाही.

आघाडी सरकारमधून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी संघटनेत सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर कोणत्याच पक्षाशी युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणास वाईट म्हणायचे आणि कोणास चांगले म्हणायचे हा प्रश्न पडला आहे. कोणतेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही, असेही यावेळी शेट्टी यांनी म्हंटले.