ही बंदी नव्हे तर कोरोनाला केलेली बंदी; राजू शेट्टींनी केलं लोकांना घरात राहण्याचं आवाहन

0
18
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली. सरकारला सांगितलंय की एक दिवस घरात थांबा तर आपण सर्वांनी घरात थांबून सरकारला सहकार्य केले पाहिजे. ही बंदी नव्हे तर कोरोनाला केलेली बंदी आहे अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार माजी खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे

कोरोनाच्या विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरल आहे. संपूर्ण जगभरात त्याचा फैलाव झाल्यामुळे ही जागतिक समस्या निर्माण झालीय. म्हणूनच कोरोनाच्या विरोधात लढाई अधिक तीव्र करण्याची आवश्यकता आहे. असंही शेट्टी म्हणाले. सरकारने सांगितलेल्या गोष्टीचा अंमल प्रत्येकानं करणं गरजेचं आहे. जगावर कितीही मोठं संकट आलं तरी माणूस हा श्रेष्ठ आहे आणि त्यानंतर ठरवलं तर तो त्यापेक्षा मोठ्या संकटावर मात करू शकतो आणि विजयी होऊ शकतो हीच वेळ आहे एकजूट होण्याची आणि या विशानूवर मात करण्याची अस देखील शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here