व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

परदेश प्रवास करून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवा- पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
परदेश प्रवास करून येणाऱ्या प्रवाशांना संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची व्यवस्था करा. त्याचबरोबर ज्यांना घरी अलगीकरण होण्याची व्यवस्था नाही अशांनाही संस्थात्मक अलगीकरण केंद्रात ठेवण्याची सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री पाटील यांनी आज प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीला आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंतकुमार बोरसे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य‍ चिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यावेळी म्हणाले, तपासणी नाक्यांवर तसेच विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची काटेकोर तपासणी करा. सर्वांनी सतर्क राहून जबाबदारी पूर्ण करावी. ज्यांना घरीच अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांची तपासणी करा. सीपीआरमध्ये येणाऱ्या प्रवाशांची सविस्तर माहिती घेवून त्यांची तपासणी करावी. अधिष्ठाता डॉ. गजभिये यांनी वेळोवेळी येथील कक्षाला भेट देवून माहिती घ्यावी, असेही ते म्हणाले. इचलकरंजी येथील आयजीएम रूग्णालयाला भेट

इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला पालकमंत्री पाटील यांनी आज भेट देवून तेथील उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी आमदार प्रकाश आवाडे, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते. यावेळी पुणे- मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना सक्तीने घरीच अलगीकरण करा. त्याचबरोबर वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून तपासणी करा. यावेळी आमदार आवाडे आणि खासदार माने यांनी 1 लाख मास्क प्रशासनाला देण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहाची पालकमंत्र्यांकडून पहाणी पूर्वतयारी म्हणून संस्थात्मक अलगीकरण केंद्रासाठी हातकणंगले येथील सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहाला पालकमंत्री पाटील यांनी भेट देवून तेथील सुविधेची पाहणी केली. आजरा, शिरोळ, गडहिंग्लज,कागल येथील वसतिगृहांचीही माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी दिली.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.