व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साधे पाणी करू शकते कोरोना विषाणूचा खात्मा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। हल्ली कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे सामान्य नागरिक चिंतेत आले आहेत. आता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्येच कोरोना संक्रमणापासून साधे पाणी बचाव करू शकते या मुळे दिलासा मिळतो आहे. साध्या पाण्याने कोरोनाचा खात्मा करता येतो केवळ पाणी कसे प्यावे हे माहिती असणे आवश्यक आहे. रुस च्या व्हॅक्टर अँड रिसर्च बायोटेक्नॉलॉजी सेंटर ने कोरोना च्या उपचारासोबत त्याच्या काही कमकुवत बाजूंचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. याच अभ्यासामध्ये त्यांना साध्या पाण्याने कोरोना रोखता येत असल्याचे दिसून आले आहे. 

मानवी शरीरात प्रवेश केल्यावर कोरोना वेगाने त्याच्या कॉपी बनवायला सुरुवात करतो मात्र जर कोरोना संक्रमण झालेल्या व्यक्तीने सतत सामान्य तापमानातील पाण्याचे सेवन केले तर कोरोनाला त्या व्यक्तीच्या शरीरात आपल्या कॉपी बनविण्याची संधी मिळत नाही. मिळालेल्या माहितीनुसार सामान्य अर्थात रूम टेम्परेचर मध्ये ठेवलेल्या पाण्याचे सेवन केल्याने आणि शरीरात पाण्याची कमतरता भासू न दिल्याने कोरोना संक्रमण रोखता येऊ शकते. सोबतच जर संक्रमण झाल्याच्या २४ तासात जर आवश्यक प्रमाणात पाण्याचे सेवन केले तर ९०% विषाणू नष्ट होतात असेही समोर आले आहे. 

७२ तासांच्या दरम्यान आपली दिनचर्या आणि पाणी यांचे योग्य मात्रेत सेवन केल्यास ९९.९% विषाणू नष्ट होतात. अर्थात दररोज स्वच्छ आणि साधे पाणी प्यायल्यास कोरोना संक्रमणापासून वाचता येऊ शकते. तसेच पाणी उकळलेले असेल तर अधिक फायदा होतो. असेही समोर आले आहे. उकळलेले पाणी कोरोना विषाणूच्या कॉपी तयार करण्यास अटकाव घालते. मानवी शरीरावर नियंत्रण मिळविण्यासाठी शरीरात प्रवेश केल्यावर वेगाने कोरोना आपल्या कॉपी तयार करू पाहतो. त्यामुळे सतत पाण्याच्या सेवनाने कोरोना रोखता येऊ शकतो. असे संशोधनातून समोर आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.