तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून आज रामजन्मभूमी मुक्त झाली- पंतप्रधान मोदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अयोध्या । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत पार पडला. वैदिक मंत्रोच्चारात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचा भूमिपूजन पार पडले. यानंतर पंतप्रधान  मोदींच्या हस्ते राम मंदिरावर आधारित नव्या टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं. तब्बल पाच लाख टपाल तिकिट छापण्यात येणार आहेत. या भूमिपूजन सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘सियावर रामचंद्र की जय’ घोषणेने आपल्या भाषणाला सुरुवात केली.  राम भूमिपूजनाचे मला आमंत्रण मिळाले हे माझं भाग्य असून आज संपूर्ण भारत राममय झाल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे असल्याचेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

आज संपूर्ण भारत राममय झालाय
”राम नामाचा हा जयघोष आज केवळ याच ठिकाणी नाही तर संपूर्ण जगात याचा जयघोष होत आहे. या ठिकाणी मला आमंत्रण देण्यात आलं हे माझ्य भाग्य. या ऐतिहासिक क्षणाचं साक्षीदार होण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. या ठिकाणी येणं हे स्वाभाविक होतं. भारत आज शरयू तिरी एक स्वर्णिम अध्याय रचला गेला आहे. आज संपूर्ण भारत राममय आणि मन दिपमय झाला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. एवढ्या वर्षांची प्रतीक्षा आज पूर्ण झाली, असंही ते म्हणाले.

राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडणारी
आता रामलल्लासाठी एका भव्य मंदिराचं निर्माण होईल. तुटणं आणि पुन्हा उभं राहणं यातून रामजन्मभूमी मुक्त झाली आहे. राम मंदिरासाठी अनेक वर्षांसाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केला. आज दिवस त्याच संकल्प आणि त्यागाचं प्रतीक आहे, असं पंतप्रधान म्हणाले. प्रभू श्रीराम आमच्या मनात आहेत. कोणतंही काम करायचं असेल तर प्रेरणा म्हणून त्यांच्याकडेच आपण पाहतो. हे मंदिर सामूहिक शक्तीचं प्रतीक बनेल. या ठिकाणी येणाऱ्यांना प्रेरणा देईल. या मंदिरामुळे या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात संधी निर्माण होईल. संपूर्ण जगातून लोकं या ठिकाणी दर्शनासाठी येतील. खुप काही बदलेल. राम मंदिराची प्रक्रिया राष्ट्राला जोडण्याची प्रक्रिया आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

मंदिरासोबत इतिहारासाचीही पुनरावृत्ती
कोरोनामुळे हा कार्यक्रम काही मर्यादांचं पालन करुन होत आहे. प्रभू श्रीराम यांच्या कार्यक्रमासाठी मर्यादांचं पालन करून झालं पाहिजे तसंच देशातील नागरिकांनी केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनी एकमेकांच्या भावनांचा आदर केला होता. या मंदिरासोबत नवा इतिहास रचला जात नाही तर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment