हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजप नेत्यांकडून वारंवार टीका केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडला येऊन मेट्रो स्थानकांची पाहणी करून मेट्रोतून प्रवासही केला. पवारांच्या या दौऱ्यावरून भाजपाने निशाणा साधला. त्यानंतर आता भाजप नेते राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. “दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जदारांनी पाहिली नव्हती, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.
भाजप नेते राम शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आतापर्यंत दबाव, दडपशाही, पैशाचा उतमात आणि सत्तेची मस्ती यापूर्वी कर्जदारांनी पाहिली नव्हती. मात्र, गेल्या पाच वर्षात जे काम केलं त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवला असून लोकांच्या मनातून जाणवते भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. याउलट जनतेला आश्वासन आणि स्वप्न दाखवणाऱ्यांनी गेल्या पाच वर्षात काहीच केले नाही. व्हाट्सअप आणि फेसबुक शिवाय कुठलाच विकास पाहायला मिळाला नाही,” अशी टीका शिंदे यांनी केली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. यात कर्जत, अकोले व पारनेर नगरपंचायत या तीनही तालुक्यातील निवडणुकीमुळे भाजपचे राम शिंदे, मधुकरराव पिचड, वैभव पिचड, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, किरण लहामटे, नीलेश लंके, शिवसेनेचे विजय औटी यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे.