हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या या भेटीबद्दल विविध राजकीय अर्थ काढले गेले. या भेटीवरून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांना सला दिला आहे. पवारांनी महाविकास आघाडी सरकारचा पाठींबा काढून घ्यावा आणि भाजपशी हातमिळवणी करावी आता खरी एनडीए सोबत जाण्याची वेळ आली आहे,” असे आठवले यांनी म्हंटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार शरद पवार यांची काळ दिल्लीत भेट झाली. या भेटीत त्यांच्यात सुमारे तासभर विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर पवार यांना केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सल्ला दिला. त्यांनी सल्ला देताना म्हंटल आहे की, पवार यांनी महाविकास आघाडी सरकारबरोबर राहण्याचा आपला निर्णय बदलावा. त्यांनी शिवसेना व काँग्रेसबरोबर न राहता भाजपशी हातमिळवणी करावी.
काँग्रेसचे नाना पटोले हे विरोधात वारंवार विधान करत आहेत. त्यामुळे पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आली आहे”, राज्याला ज्या पद्धतीचे एक प्रकारचे प्रबळ सरकार हवे आहे. त्या पद्धतीचे हे महाविकास आघाडीचे सरकार अजिबात नाही. त्यामुळे राज्यात सत्तांतर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लवकर एनडीए सोबत येण्याचा विचार करावा, अशी विंनती केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी आज केली आहे.