हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारसह राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे पक्षाच्या आमदारांसह सेनेतून बाहेर पडत शिवसेनेला धक्का दिला आहे. यावर आता आरपीआयचे नेते तथा केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे आठवले यांनी ट्विट केले आहे.
रामदास आठवले यांनी नुकतेच एक ट्विट केले असून त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे. महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही,” असं रामदास आठवले यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला जबरदस्त दणका दिला आहे.महाविकास आघाडी चे सरकार अल्पमतात आल्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 21, 2022
एकनाथ शिंदे १५ ते ३५ आमदारांसहित सूरतमधील हॉटेलमध्ये थांबले असून त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षाकडून पूर्ण प्रयत्न सुरु आहेत. भाजप नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया उमटत असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.