राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी; रामदास आठवले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी : शुभम बोडके

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले आहे. अशात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्या दौऱ्याला विरोध होऊ लागला आहे. यावरून आरपीआयचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांना उत्तर प्रदेशमध्ये येऊन देणार नाही अशा प्रकारची भूमिका तिथल्या स्थानिक लोकांनी घेतली आहे आणि त्यांची भूमिका योग्यच आहे. तुम्ही आम्हाला मुंबईमध्ये येण्यास बंदी करता तर तुम्ही कसे काय उत्तर प्रदेशात येऊ शकता,असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी, अशी मागणी आठवले यांनी केली आहे.

मंत्री रामदास आठवले यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरे यांना एवढ्या दिवसानंतर अयोध्याची आठवण आली आहे. आता ते राम मंदिराच्या दर्शनाला जाऊ इच्छितात. त्यांना जायचं होतं तर त्यांनी अगोदर का गेले नाही?

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/408706531262679

माझ्या पक्षाने मुस्लिम समाजाला संपूर्ण सपोर्ट केला आहे आणि सर्व हिंदूंचा राज ठाकरे यांच्या भूमिकेला पाठिंबा आहे असे काही नाही. केवळ मूठभर लोकांचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे. राज ठाकरे यांनी आता उत्तर प्रदेशातील लोकांची माफी मागावी. आपण सर्व एकच आहोत. आपला देश एकच आहे. उत्तर भारतीय काय अन महाराष्ट्रीयन काय गुजराती काय आपण सर्व एकच आहोत, अशी मोठी भूमिका राज ठाकरेंनी घ्यावी.

अडीच हजार वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी भगवा रंग निवडला होता. भगवा रंग हा शांततेचे प्रतीक दिशा देणारा भगवा रंग आहे. तो वाद पेटवण्याचा रंग अजिबात नाही. काही मनसेची लोक बोलत आहेत कि आम्ही महाराष्ट्र पेटून टाकू. त्यांना एवढंच सांगतो की, तुम्ही पेटवायला तयार असाल आम्ही तुम्हाला भेटून देणार नाही, असेही आठवले यांनी म्हणाले.

राणा दांपत्याला ‘RPI’ पाठिंबा देणार – रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले सातारा दौऱ्यावर आले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत पोलिसांनी दिलेले आदेश हे चुकीचे आहेत. त्यांनी जरी आदेश दिले तरी पोलिसांनी त्यांना विरोध करणे आवश्यक होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यांनी राणा दांपत्याला त्यांच्या घरात जाऊन ताब्यात घेतले. त्यानंतर राणा दांपत्याने माझी दिल्लीत भेट घेतली. सविस्तर माहिती देत कैफियत माझ्यापुढे मांडली. त्यावरून आम्ही राणा दांपत्याला पाठींबा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे आठवले यांनी सांगितले.

Leave a Comment