Budget 2022 : सबका साथ सबका विकास या तत्त्वावर केंद्र सरकारचे काम सुरु – रामनाथ कोविंद

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आजपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीपासून प्रजासत्ताक दिनाला सुरुवात आहे. सबका साथ सबका विकास या तत्त्वावर सरकारचे काम सुरु आहे. कोरोनानं संपूर्ण जगभरात प्रभाव टाकला. आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण गमावलं. अशा कठीण प्रसंगी संसर्गाच्या काळात आपण टीम म्हणून काम केले. केंद्र सरकारची पार्थमिकता हि महिला सशक्तीकरण असल्याचे यावेळी राष्ट्रपतींनी सांगितले.

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतीच सुरू झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी अभिभाषण केले. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे केंद्र सरकारच्यावतीने विशेष काळजी घेण्यात आली. आम्ही एका वर्षापेक्षा कमी कालावधीत 150 कोटी डोस दिले.

कोरोना लसीकरणामुळे लोकांचे मनोबल वाढले. 70 टक्केहून अधिक लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत. किशोरवयीन मुलांचेही लसीकरण केले जात असून आठ कोरोना लसींना भारताने मंजुरी दिली आहे. त्यातील भारतातील तीन लसींना जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिली आहे. कोरोना काळात फार्मा कंपन्यांनी काम करुन दाखवले असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.

“सरकारच्या धोरणांमुळे आज भारत अशा देशांमध्ये आहे जिथे इंटरनेटची किंमत सर्वात कमी आहे. स्मार्ट फोनची किंमत देखील सर्वात कमी आहे. भारतातील तरुण पिढीला याचा मोठा फायदा होत आहे. सरकारच्या सततच्या प्रयत्नांमुळे भारत पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनला आहे. आज भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मोबाइल फोन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे. त्यामुळे भारतातील लाखो तरुणांना रोजगारही मिळाला आहे,” असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले.

दोन सत्रात होणार अधिवेशनाचे कामकाज

आजपासून सुरु झालेल्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे. दि. 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. राज्यसभेचे कामकाज सकाळी 8 ते दुपारी 2 आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. त्यामुळे सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी शून्य प्रहर व प्रश्नोत्तराचा तास होणार नाही.