Satara News : बाजार समितीची निवडणूक अग्निपरीक्षा, सावध रहा; रामराजेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

Ramraje Naik-Nimbalkar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरेगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी सध्याच्या भाजप-शिवसेनेच्या युतीकडे कार्यकर्ते कमी पण भावनिक करण्याची क्षमता आणि कला आहे. आपल्यातील दुही हीच त्यांची शक्ती झाली आहे. त्यामुळे कोरेगाव बाजार समितीची निवडणूक अग्निपरीक्षा आहे. सध्या पाय ओढण्याचे व जिरवाजिरवीचे राजकारण गावागावांत सुरू आहे. त्याचा फायदा भारतीय जनता पक्ष घेत आहे. त्यामुळे आपण सावध राहिले पाहिजे, असा सल्ला रामराजे नाईक निंबाळकर यांनी कार्यकर्त्यांना दिला.

कोरेगाव येथे पार पडलेल्या बैठकीवेळीआमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, शिवाजीराव महाडिक, बाळासाहेब सोळसकर, रामभाऊ लेंभे, तेजस शिंदे, आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी रामराजे म्हणाले, ‘आपण आपल्यातीलच जिरवाजिरवीच्या राजकारणासाठी सुरू असलेला खो-खो, कबड्डीचा खेळ थांबविला पाहिजे. कारण या राजकारणामध्ये धोका अधिक आहे. माझ्यासह शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, नितीन पाटील, असे आम्ही सर्व जण एकत्रित आहोत. एकसंधपणे या निवडणुकीला सामोरे जाऊ या. या निवडणुकीत आपल्यामध्ये खो-खो, कबड्डीचा खेळ नको.