हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे राज्यसभेच्या तर दुसरीकडे मुंबईच्या महापालिका निवडणुकीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. अशात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. “आरपीआयला बीएमसी निवडणुकीत 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजेत. यापैकी आरपीआयच्या 18 ते 20 जागा निवडून येतील. मात्र, त्यासाठी शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे, असे मोठे विधान आठवले यांनी केले आहे.
मंत्री आठवले यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.या यावेळी ते म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आरपीआय नेही आपला दावा दाखवला आहार. या निवडणुकीत आरपीयला 35 ते 36 जागा मिळाल्या पाहिजे. आमचा यापैकी 18 ते 20 जागा निवडून आणायचा प्रयत्न असेल. कोणत्याही परिस्थितीत आम्ही मुंबई महानगर पालिका शिवसेनेकडून हिसकावून घेणार आहोत. प्रत्येकवेळी पावसाळ्यात मुंबई तुंबते, मुंबईची तुंबई करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून झाला आहे. म्हणून शिवसेनेला सत्तेतून बाहेर काढणे अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी मंत्री आठवले यांनी यशवंत जाधन यांना महापौर पदाची संधी न दिल्याच्या कारणावरून शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, यशवंत जाधव यांना चार वेळा स्थायी समिती सभापद दिले. मात्र, बौद्ध असल्यामुळे महापौर पदाची संधी दिली नाही. यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार आहेत. मात्र, तरीही त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. बौद्ध समाजाला डावलण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून वारंवार झाला आहे, असे आठवले यांनी म्हंटले.