हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे एका कार्यक्रमप्रसंगी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले आणि पाचच वर्षात चुलीसमोर बसलेल्या महिलांचं दुःख दूर करण्यासाठी त्यांनी 100 रुपयात गॅस उपलब्ध करून दिला. मात्र, एक महिला 11 वर्षे देशात पंतप्रधान होती, पण महिलांचे दुःख दूर केले नाही,” असे वक्तव्य करत मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
भाजप नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज औरंगाबाद येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखाली आज औरंगाबाद शहरात गॅस पाइप लाइनच्या कामाचा शुभारंभ होत आहे. येत्या काही वर्षात घरोघरी पाइपद्वारे गॅस पोहोचणार आहे.
यावेळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल टीका करताना मंत्री दानवे म्हणाले की, एक महिला देशात 11 वर्ष पंतप्रधान होती. पण महिलांचं दुःख तिनं समजून घेतलं नाही. फक्त चूल आणि मूल हेच महिलांचं काम आहे, असं त्यांना वाटत होतं, असे दानवे यांनी म्हंटले.