हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर प्रदेश आणि गोव्यात पराभव पत्करावा लागला. यावरून भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. “शिवसेना राष्ट्रीय पक्ष होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यांचं स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे हा पक्ष जिथे जाईल तेथे उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होईल. आणि 2024 मध्ये राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आम्ही पाडणार नाही तर जनताच हे सरकार पाडेल,” असे दानवे यांनी म्हटले
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, देशाच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या निवडणुकीत शेवटी भाजपलाच जनतेनं झुकतं माप दिले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही याचे पडसाद दिसतील. 2024 मध्ये राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार आम्ही पाडणार नाही तर जनताच हे सरकार पाडेल.
शिवसेनेने गोव्यात 10 उमेदवार उभे केले होते. मात्र येथेही त्यांना अपयशाला तोंड द्यावे लागले. पाच राज्यांतील जनतेने दिलेला कौल हा महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम करणारा ठरेल, असे दानवे यांनी यावेळी म्हंटले.