हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जालना शहरात आज पाण्याच्या प्रश्नावरून भाजपच्या वतीने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मंत्री रावसाहेब दानवे यांनी फडणवीस यांचे कौतुक केले. “आजच्या शतरंजच्या खेळात शतरंज का बादशहा कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत”, असे दानवे यांनी म्हंटले
औरंगाबादनंतर जालन्यात भाजपतर्फे जलाक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी आयोजित सभेत मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, जालन्यात 12 दिवस पाणी येत नाही. आमच्या सरकारमध्ये आम्ही वितरण व्यवस्थेसाठी निधी मंजूर केला. आम्ही लोकांचा चेहरा बनून हा मोर्चा काढला आहे. कुणीतरी राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे आम्ही जालनेकरांचा आवाज बनून पुढे आलो आहोत, पालिका प्रशासनाला आमचा आक्रोश ऐकावाच लागेल. आजचा मोर्चा हा मोर्चा नसून हा इशारा आहे, असे दानवे यांनी म्हंटले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जालना येथे भव्य 'जल आक्रोश मोर्चा' https://t.co/PJcFUwOj9K
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) June 15, 2022
राज्यसभेच्या निवडणुकीत अशी चौसर खेळली गेली तेव्हा आपल्याकडे मते कमी आणि त्यांच्याकडे जास्त होती. सगळे उत्साहात होते. अशा परिस्थितीत आपल्या शतरंजच्या बादशहा देवेंद्र फडणवीस यांनी आपले खासदार निवडून आणले, असे गौरवोद्गार दानवे यांनी काढले. जालना शहरात आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील पाणी प्रश्न पेटला आहे. शहरातील दोन्ही जलाशयांमध्ये पाणी उपलब्ध असतानाही पंधरा दिवसा आड पाणी येतं. तसेच अंतर्गत जलवाहिनी उशीराने होत आहे.