हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेकवेळा जाते. मात्र, टीका करत असताना त्याच्याकडून अनेक वक्तव्ये केली जातात. असेच एक वक्तव्य आज दानवे यांनी केले. ” मी राजकारणातील कुंभार आहे. हातातलं मडकं फुटलं की कुंभार रडत नाही. फेकून देतो आणि पुन्हा नवं तयार करतो. मी अनेक नेते तयार केले आहेत, असे वक्तव्य मंत्री दानवे यांनी केले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आज युवा मोर्चा भाकरी घरच्या डब्बा पार्टी कार्यक्रमास उपस्थिती लावली. यावेळी ते म्हणाले की, या ठिकाणी मी सध्या कार्यकर्त्यांना निवडणूकीसाठी तयार करायला आलो आहे. आजची परिस्थिती कशी आहे. भाजपा विरोधात सगळे उभे आहेत. हे वर्ष निवडणूकीचे आहे. हे नगरपंचायत निवडणुकीत आम्ही सर्वांना दाखवून दिले आहे.
राजकारणातील पक्षांमध्ये कार्यकर्ता कसा असला पाहिजे, मूळ नाही गाजर नाही हे उपटलं की एकटं निघते. कार्यकर्ता भुईमूगाच्या वेलासारखा पाहिजे, उपटला की गुच्छदा होतो. सत्तार म्हणतात की मी पंचायत समिती हरलो. आमचे 3 उमेदवार 15 मतांनी पडले. सत्तार यांना सोयगाव मध्ये 15 हजार मतांची आघाडी होती, ती 15 मतांवर आली आहे. अब्दुल सत्तार यांना आव्हान करतो कि आपणे गल्ली में तो हर कोई शेर होता है. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेला माझ्या विरोधात उभा रहावे. मी तयार आहे, असे आव्हान दानवे यांनी सत्तार यांना दिले .