शरद पवार धूर्त, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाग घ्यायचा कि नाही हे समजण्याइतके ते…; रावसाहेब दानवेंची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत आहे. यावेळी राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. मात्र, पवारांनी आपली ही निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याचे जाहीर केले आहे. पवारांच्या या उमेदवारीच्या चर्चेवरून भाजपचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. “शरद पवार हे आमचे विरोधी पक्षाचे नेते आहेत, ते या पदाला लायक आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही. पण या निवडणुकीत भाग घ्यायचा की नाही घ्यायचे हे समजण्याइतके ते धूर्त आहेत, असे दानवे यांनी म्हंटले आहे.

जालन्यात आज भाजपच्या वतीने जलाक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी उपस्थति लावलीय. यावेळी मंत्री दानवे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दानवे म्हणाले की, राष्ट्रपती पदाची निवडणूक हा आकड्यांचा खेळ आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व पक्षाने सहमतीने एक उमेदवार दिला पाहिजे. शरद पवार यांच्याबद्दल बोलायचे झाले तर ते आमचे विरोधी पक्षाचे नेते आहेत.

राष्ट्र्पती पदासाठी ते लायक आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार आमचा नाही. तेच त्यांनीही हि निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे, या निवडणुकीत भाग घ्यायचा की नाही घ्यायचे हे समजण्याइतके ते धूर्त आहेत, अशी टीका दानवे यांनी केली आहे. दरम्यान सांवे यांच्या टीकेला आता राष्ट्वादीच्या नेत्यांकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पहावे लागणार आहे.

Leave a Comment