हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शिंदे गटात प्रवेश केल्याचे जाहीर केले. मात्र, यावेळी खोतकर यांनी भाजपकडे जालना लोकसभेची जागा मागितली. यावरून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी खोतकरांना सुनावले आहे. “जालना लोकसभेची जागा मागत आहात. ही जागा बापाची जहागिरी आहे काय? ही जागा भाजपची आहे,” असे दानवे यांनी म्हंटले आहे.
रावसाहेब दानवे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, जालना लोकसभेची जागेवर अधिकार दानवेंचा थोडाच आहे. उद्या आमच्या पक्षाचे सरचिटणीस मुलतानी हे देखील तिथून उभे राहू शकतात. ते आणि मी खुर्च्या टाकून जागांचे वाटप करत बसलो तर झालेच. तो काय जालन्यातला पक्ष आहे का? असा सवाल दावने यांनी केला आहे.
अर्जुन खोतकर काय म्हणाले?
आज पत्रकार परिषद घेत अर्जुन खोतकर म्हणाले की, रावसाहेब दावने यांनी मला लोकसभेला समर्थन द्या, तुम्हाला दुसरी जागा देता येईल. कारण ही जागा भाजपची असून मीच सध्या इथला विद्यमान खासदार आहे. त्यावर मी त्यांना म्हटलं की, हा निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाका. शिवाय, “तुम्ही अनेक वर्षे इथून लढलात आता ती मला लढवू द्या, असं मी त्यांना म्हटल्याच खोतकर यांनी सांगितलं.