पीडित मुलगी हात जोडत विनवणी करत राहिली तरीही नराधम दीड वर्षे करत होता ‘हे’ दुष्कृत्य

जयपूर : वृत्तसंस्था – राजस्थानमधील पाली या ठिकाणी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये 8वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून दीड वर्षे बलात्कार करण्यात आला आहे. हि अल्पवयीन मुलगी या नराधमाला हात जोडत राहिली, मात्र त्याला तिची अजिबात दया आली नाही. तो तिच्यावर बलात्कार करतच राहिला. जर या मुलीने त्याला शरीरसंबंधास नकार दिला तर तो मुलीला अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत होता. यानंतर या सगळ्या प्रकाराला वैतागून पीडितेने अखेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
या नराधम आरोपीचे नाव कल्पेश शर्मा असे असून त्याचा बांगड्या निर्यात करण्याचा व्यवसाय होता. आरोपीचे पीडितेच्या घरी सतत येणं-जाणं सुरू होतं. तो मुलीसाठी कधी चॉकलेट तर कधी गिफ्ट घेऊन येत होता. यानंतर हळूहळू हि पीडित मुलगी त्याच्या प्रेमात पडली. यानंतर आरोपीने संधी साधून तिच्यावर बलात्कार केला आणि तिचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो काढले. यानंतर या आरोपीने तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीने या मुलीने हि गोष्ट कोणालाही सांगितली नाही.

हा आरोपी दिड वर्षे मुलीला तिचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करीत होता. तो तिला अनेकवेळा हॉटेलमध्येसुद्धा बोलवत होता. यादरम्यान पीडित मुलगी अनेकवेळा त्याच्यासमोर रडली, हात जोडले मात्र तो नराधम तिच्यावर अत्याचार करीत राहिला. सातत्याने होत असलेल्या बलात्कारामुळे पीडितेने आरोपीसोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर तिने त्याचे फोन उचलणे बंद केले. आरोपीला या गोष्टीला राग आल्याने त्याने पीडितेचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले. यानंतर या मुलीने हि गोष्ट आपल्या आईला सांगितली. त्यानंतर पीडितेच्या आईने कल्पेशविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

You might also like