बसच्या धडकेतून थोडक्यात बचावला तरुण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – देशात रोज हजारो रस्ते अपघात होतात. यामध्ये काही लोक अपघातांना बळी पडतात तर काही लोकांचे नशीब चांगले असते म्हणून त्यांना काहीच होत नाही. याच गोष्टीचा प्रत्यय कर्नाटकातल्या मंगळुरू या ठिकाणी पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि भरधाव वेगानं स्कूटी चालवणारा तरुण बसला धडकल्यानंतर थोडक्यात बचावला आहे.

देव तारी त्याला कोण मारी
मंगळुरूमधल्या एलियार पडवू रोडवर हि दुर्घटना घडली आहे. हा रस्ता जास्त वर्दळीचा नसतो. मात्र मंगळवारी संध्याकाळी या ठिकाणी एक विचित्र घटना घडली. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि एक खासगी बस मंगळुरूहून एलियार पडवूला जात होती. त्यावेळी रस्त्यावर फारशी वाहनं नव्हती. इच्छित स्थळी पोहोचल्यानंतर बस चालकाने अचानक यू-टर्न घेतला. यावेळी पलीकडून भरधाव वेगाने बाईकस्वार या बसचालकाला दिसला नाही. हा बाईकस्वार कसाबसा या बसच्या धडकेतून वाचण्यात यशस्वी होतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ त्याठिकाणी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मँगलोर सिटी या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि स्कूटरस्वाराचे बाइकवरील नियंत्रण सुटलं आणि त्याची स्कूटर तिथे असलेल्या फिश प्रोसेसिंग युनिटच्या दरवाजाला धडकली. मात्र नशीब बलवत्तर म्हणून या बाइकस्वाराला कोणतीही दुखापत झाली नाही.

You might also like