नवी दिल्ली । टाटा सन्सचे (Tata sons) अध्यक्ष रतन टाटा (Ratan Tata) यांनी प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्समधील (Pritish Nandy Communication) आपले भागभांडवल वाढवले आहे. टाटा यांनी या कंपनीत गुंतवणूक केल्याची बातमी समोर आलेली आहे. प्रितीश नंदी कम्युनिकेशन्सने सोमवारी सांगितले की,”ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे.” तथापि, गुंतवणूकीच्या रकमेबद्दल अद्याप काहीही बोलले गेले नाही. टाटा सन्सचे अध्यक्ष आणि टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या पसर्नल कॅपॅसिटी द्वारे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्स लिमिटेडचा भाग घेतला आहे, असे प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सने नियामक माहितीत म्हटले आहे.
कंपनीचे शेअर्स वाढले
यानंतर 15 मार्च रोजी शेअर बाजारा (Share market) मध्ये प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सच्या शेअर्समध्ये 10% वाढ झाली. सोमवारी दुपारी प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्सचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 23.50 रुपयांवर ट्रेड करीत होते. यामुळे इंट्रा-डेमध्ये कंपनीचे शेअर्स वाढले. पहिल्या सत्रात शेअर्स 4.25% किंवा 0.95 रुपयांनी घसरून 21.40 रुपयांवर बंद झाले.
कंपनीबद्दल जाणून घ्या
रतन टाटा स्टार्टअप्स आणि टेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ओळखले जातात. प्रीतीश नंदी कम्युनिकेशन्स (PNC) ची स्थापना सप्टेंबर 1993 मध्ये झाली. याची सुरुवात टीव्ही कंटेंट बुटीक म्हणून झाली. त्यांनी गेल्या अनेक वर्षांत अनेक बातम्या आणि करमणूक कार्यक्रमही केले. कंपनीने 18 वर्षांत सतत वाढ केली आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार PNC चे मूल्य आज 2653 मिलियन रुपये आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.