आता रेशन कार्डधारक मोबाइल अ‍ॅप द्वारे बुक करू शकतील रेशन, त्याचे फायदे आणि रजिस्ट्रेशन कसे करावे हे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आतापासून आपल्याला रेशन (Ration) मिळण्यासाठी लांबलचक लाईन लावण्याची आवश्यकता नाही. आपण घरबसल्या आपल्या मोबाइलद्वारे रेशन बुक करू शकता. केंद्र सरकारने रेशनकार्डधारकांसाठी Mera Ration App सुरू केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्हाला रेशन मिळण्यास बरीच सहजता मिळेल. मेरा रेशन अ‍ॅप (Mera Ration App) हे भारत सरकारने सुरू केलेल्या वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग आहे. आपण घरबसल्या रेशन कसे बुक करू शकता हे जाणून घेउयात.

मेरा रेशन अ‍ॅप कसे डाउनलोड करावे आणि कसे वापरावे?
>> पहिले गुगल प्ले स्टोअरवर जा.
>> यानंतर सर्च बॉक्समध्ये मेरा राशन अ‍ॅप सर्च करा.
>> मेरा रेशन अ‍ॅप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
>> मेरा रेशन अ‍ॅप उघडा.
>> रेशन कार्ड डिटेल्सद्वारे तुमचे रजिस्ट्रेशन करा.

मेरा रेशन अ‍ॅप चे फायदे-
>> प्रवासी लोकांना सर्वाधिक फायदा होईल.
>> या अ‍ॅपद्वारे तुम्हाला रेशन शॉपची अचूक माहिती मिळेल.
>> रेशनकार्ड धारकदेखील त्यांच्या सूचना शेअर करू शकतील.
>> रेशन घेण्याशी संबंधित सर्व माहिती मिळेल.
>> कार्ड धारकांना मिळालेल्या धान्यांविषयीची माहिती मिळू शकेल.
>> सर्वांना सहजपणे रेशन उपलब्ध होईल.

आपल्या जवळचे दुकान देखील शोधू शकता
मेरा रेशन अ‍ॅपच्या मदतीने, टॅप करून युझर्स जवळच्या रेशनचे दुकान शोधू शकतील. या व्यतिरिक्त, युझर्सना त्यांच्या पात्रतेच्या डिटेल्स आणि अलीकडेच केलेल्या व्यवहाराच्या डिटेल्स देखील पाहता येईल. सध्या हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे, परंतु लवकरच अन्य 14 भाषांमध्येही ते उपलब्ध होईल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या अ‍ॅपवरून, तुम्ही रेशन कधी आणि कोणत्या दुकानातून घेण्यात आले याचीही माहिती मिळणार आहे.

कोणाला फायदा होईल?
या ऑफरनंतर अन्न सचिव सुधांशु पांडे म्हणाले की नवीन मोबाइल अ‍ॅपचा उद्देश एनएफएसएचे लाभार्थी, विशेषत: स्थलांतरित लाभार्थी, फेअर प्राइस शॉप किंवा रेशन शॉप विक्रेते आणि इतर भागधारकांमध्ये ओएनओआरसीशी संबंधित सेवा देणे आहे जेणेकरून ते सोयीचे होईल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

 

 

Leave a Comment