हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिधापत्रिकाधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारकडून लाखो रेशन कार्ड धारकांना मोफत रेशन सुविधा दिली जात आहे. यावर्षी म्हणजे 2023 मधेही फ्री रेशन मिळणार आहे. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे काही अपात्र लोकही मोफत रेशनचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे, अशा लोकांवर सरकारकडून मोठी कारवाई करण्यात येणार आहे. सरकारने त्यासाठी काही नियम जारी केले आहेत. त्यामध्ये ज्यांचा समावेश येतो त्यांचं रेशनकार्ड रद्द होणार आहे.
कोणत्या लोकांचं रेशनकार्ड रद्द होणार ?
1) जर एखाद्या कार्डधारकाकडे 100 चौरस मीटरचा प्लॉट/फ्लॅट किंवा घर असेल तर त्याचे कार्ड रद्द होऊ शकत
2) रेशन कार्ड धारकाकडे चारचाकी गाडी किंवा ट्रॅक्टर असेल आणि शस्त्र लायसन्स असेल तरी त्याचे कार्ड रद्द होणार आहे.
3) गावात दोन लाखांपेक्षा जास्त आणि शहरात तीन लाखांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असेल तर अशा लोकांचं रेशनकार्ड रद्द होऊ शकत
सरकारच्या नियमानुसार रेशनकार्ड धारकाने आपलं कार्ड सरेंडर केले नाही तर अशा लोकांचे कार्ड तपासणीअंती रद्द केले जातील. तसेच त्या कुटुंबावर सरकारकडून कायदेशीर कारवाईही होऊ शकते. एवढेच नव्हे तर अशा लोकांकडून तो ज्या वेळेपासून रेशन घेत आहे, त्यावेळेस रेशनही वसूल केले जाईल. त्यामुळे अशा लोकांनी स्वतःहून त्यांचे रेशनकार्ड रद्द करून घ्यावीत, असे आवाहन सरकारच्या वतीने जनतेला करण्यात येत आहे