Ration Card: रेशनकार्डमध्ये नोंदलेल्या व्यक्तीच्या मृत्यूची किंवा चुकीची माहिती देऊन रेशन घेतल्यास आता होणार इतक्या वर्षांची शिक्षा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील अनेक राज्यांत सध्या रेशनकार्ड (Ration Card) मध्ये नावे जोडण्याचे आणि काढून टाकण्याचे काम जोरात सुरू आहे. रेशन कार्ड मधील फसवणूकीच्या (Fraud) प्रकरणात अनेक राज्य सरकारांनी पोलिस तपासही (Police Investgation) तीव्र केला आहे. रेशनकार्डमध्ये एखाद्या व्यक्तीचे चुकीचे नाव असल्यास किंवा रेशन कार्डमध्ये नोंदलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या कोट्यातील रेशन घेण्यावर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली आहे. रिकव्हरी विभागाने या प्रकारच्या फसवणूकीचा तपास सुरू केला आहे. अन्न पुरवठा विभाग फसवणूकीच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करत आहे. तर आता आपण चुकीच्या डॉक्यूमेंटससह रेशनकार्ड बनविल्यास किंवा चुकीच्या नावाने रेशन घेतल्यास, आता तुरुंगवास आणि दंड देखील होऊ शकतो.

रेशन कार्ड बनविण्यासाठी काही अटी पूर्ण करणे अनिवार्य आहे
रेशन कार्ड तयार करण्यासाठी काही अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे, परंतु लोकं रेशन कार्ड मिळविण्यासाठी दारिद्र्य रेषेच्या किंवा अंत्योदय योजनेच्या खाली जाण्यासाठी चुकीचे डॉक्यूमेंटस सादर करतात. बनावट रेशन कार्ड बनविणे हा भारत सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत दंडनीय गुन्हा आहे. बनावट रेशनकार्ड बनविण्याबद्दल दोषी ठरल्यास तुम्हाला पाच वर्षांची तुरूंगवासाची शिक्षा आणि दंडही भरावा लागू शकतो. यासह आपण कार्ड तयार करण्यासाठी अन्न विभागाच्या अधिकाऱ्याला लाच दिल्यास किंवा अन्न विभागाच्या अधिकाऱ्याने लाच घेऊन शिधापत्रिका बनविली तर या प्रकरणातही शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे.

वन नेशन वन रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधा लागू केली
केंद्र सरकारने देशभरात वन नेशन वन रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधा लागू केली आहे. आतापर्यंत देशातील जवळपास सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश या सुविधेखाली आहेत. या सुविधेद्वारे आता ग्राहकांना इतर राज्यांतही रेशन मिळू शकेल. यासाठी, आता त्या व्यक्तीस त्या राज्यातील रहिवासी असणे आवश्यक नाही. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील लोकांना आता कोणत्याही राज्यात सहज रेशन मिळू शकेल. विशेषत: दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी केंद्र सरकारची ही योजना अत्यंत प्रभावी आहे.

बनावट रेशनकार्डबाबत सरकार कडक
रेशन कार्ड हे भारत सरकारचे मान्यताप्राप्त सरकारी डॉक्यूमेंटही आहे. रेशनकार्डच्या सहाय्याने लोकं सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील बाजारभावापेक्षा अगदी स्वस्त दराने धान्य (गहू, तांदूळ आणि डाळी) खरेदी करू शकतात. भारतात सहसा तीन प्रकारची रेशनकार्ड बनविली जातात. दारिद्र्य रेषेच्या वर राहणाऱ्या लोकांना एपीएल, दारिद्र्य रेषेखालील राहणाऱ्यांना बीपीएल आणि सर्वात गरीब कुटुंबांना अंत्योदय रेशनकार्ड दिली जातात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.