हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठवाड्यातील नुकसानीवरून भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे. येथील नुकसानीवरून विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यानंतर आता रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. आक्रमक झालेल्या खोतांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका केली आहे. नुकसानीमुळे शेतकरी सरणावर गेला तरी त्याला मदत केली जात नाही,” अशी टीका खोत यांनी केली आहे.
माजी मंत्री तथा रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी खोत म्हणाले की, मराठवाडा, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी होरपळून गेला आहे. आम्हाला राज्य सरकारने तातडीची मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला मदत करण्याऐवजी राज्यसरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना 20 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे. बागायती शेतकऱ्यांना व फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये आणि जिरायती शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी.
फडणवीसांच्या काळात अतिवृष्टी झाली होती मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते. त्यावेळी फडणवीस सरकारने केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची वाट पाहिली नाही. तर शेतकऱ्यांना वेगवेगळ्या संकटनामध्ये पॅकेज जाहीर करून मदत केली. सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री नुसते आम्ही चिंतामुक्त करू असे हणत आहेत. पण शेतकरी सरणावर गेला तरी तुम्ही त्याला चिंतामुक्त करायला तयार नाही,” अशा शब्दात खोत यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.