हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आता कर्ज घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. RBI चे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील चलनविषयक धोरण समितीने (MPC) वर्षभरात पहिल्यांदाच रेपो दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. MPC च्या या बैठकीनंतर गव्हर्नर दास म्हणाले की,” सध्या रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवला जाईल.” हे लक्षात घ्या कि, मे 2022 पासून रेपो दरात 6 वेळा वाढ करण्यात आली आहे. या दरम्यान रेपो दर एकूण 2.50 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे.
रेपो रेट हा तो दर आहे ज्यावर व्यावसायिक बँका RBI कडून पैसे घेतात. होम-ऑटोसहीत बहुतेक रिटेल लोन हे रेपो दरावर आधारित आहेत. तसेच यावेळी रेपो दरात वाढ न झाल्याने बँकांकडूनही रिटेल लोनच्या व्याजदरात वाढ केली जाणार नाहीत. ज्याचा थेट फायदा घर खरेदीदारांना होणार आहे. चलनवाढ कम्फर्ट झोनमध्ये असल्याने यावेळी रेपो दरात वाढ करण्यात आली नसल्याचे गव्हर्नर दास यांनी सांगितले आहे.
जगभरातील वाढती महागाई आणि महागलेल्या कर्जाबाबत भारतीय बँकांनी RBI कडे चिंता व्यक्त केली होती. महागाई आणि व्याजदर यांच्यातील संतुलन राखण्यासाठी रेपो दरात सातत्याने वाढ करणे योग्य नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास एमपीसीच्या पुढील बैठकीत रेपो दरात पुन्हा वाढ केली जाऊ शकते.
शक्तिकांत दास पुढे म्हणाले की,” चालू आर्थिक वर्षात (2023-24) भारताच्या जीडीपीमध्ये 6.5 टक्के वाढ होईल, जी आधी 6.4 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत म्हणजेच 2022-23 मध्ये विकास दर 5.9 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. यापूर्वी हा दर 5.8 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता. तसेच चालू आर्थिक वर्षात महागाई 5.2 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते. यापूर्वी तो 5.3 टक्के असण्याचा अंदाज व्यक्त केला गेला होता.
हे पण वाचा :
Saving Account : मुलांच्या नावाने खाते कधी उघडता येईल ??? यावर कोणकोणत्या सुविधा मिळतील ते तपासा
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Banking Rules : ‘या’ बँकांच्या ग्राहकांनी खात्यामध्ये नेहमी ठेवावे इतके पैसे, अन्यथा द्यावा लागेल मोठा दंड
Multibagger Stock : फार्मा क्षेत्रातील ‘या’ दिग्गज कंपनीने गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/Annualpolicy.aspx