RBI ने ‘या’ बँकेवर घातले निर्बंध, आता ग्राहकांना 10,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत

नवी दिल्ली । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने अहमदगर, महाराष्ट्र येथे असलेल्या नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. वर अनेक निर्बंध लादले आहेत. यानंतर, बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपये निश्चित करण्यात आल्याने त्यांच्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. याचा अर्थ बँकेचे ग्राहक यापुढे त्यांच्या स्वतःच्या खात्यातून 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढू शकणार नाहीत. बँकेची बिकट आर्थिक स्थिती पाहता RBI ने हे पाऊल उचलले आहे.

निर्बंध 6 महिन्यांसाठी लागू राहतील
बँकिंग नियमन कायदा (सहकारी संस्थांना लागू), 1949 अंतर्गत हे निर्बंध 6 डिसेंबर 2021 रोजी कामकाजाची वेळ संपल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू राहतील आणि त्यांचे पुनरावलोकन केले जाईल. RBI ने म्हटले आहे की, बँक त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा कोणतीही ऍडव्हान्स रक्कम देऊ शकणार नाही , याशिवाय ते कोणत्याही कर्जाचे नूतनीकरण करू शकणार नाही. बँकेला कोणतीही गुंतवणूक करणे, कोणत्याही प्रकारचे दायित्व घेणे, पेमेंट करणे आणि मालमत्तेचे हस्तांतरण किंवा विक्री करणे देखील प्रतिबंधित केले जाईल.

बँकेच्या आवारात लावली ऑर्डरची प्रत
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून 10,000 रुपयांपेक्षा जास्त काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकेल. मात्र, RBI ने हे देखील स्पष्ट केले आहे की, या निर्बंधांना बँकिंग लायसन्स रद्द होणे असे समजले जाऊ नये.

You might also like