व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

BIG BREAKING : RBI कडून Repo Rate मध्ये पुन्हा वाढ; Car आणि Home Loan होणार महाग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI) कडून रेपो रेट (RBI Repo Rate) मध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. आज RBI च्या चलनविषयक धोरण समितीची बैठक पार पडल्यांनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 25 बेस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार, रेपो रेट 6.25% वरून 6.50% पर्यंत वाढला आहे.

आरबीआयने सलग सहाव्यांदा रेपो दरात (RBI Repo Rate) वाढ केली आहे. यापूर्वी मे २०२२ मध्ये रेपो रेट मध्ये 0.40 टक्के, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी 0.50 टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती. तर डिसेंबरमध्ये रेपो रेट 0.35 टक्क्यांनी वाढवण्यात आला होता. रेपो रेटच्या या वाढीमुळे होम लोनपासून ते ऑटो आणि पर्सनल लोनपर्यंत सर्व काही महाग होणार असून तुम्हाला जास्त ईएमआय भरावा लागेल. देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर जनतेला बसलेला हा पहिला झटका आहे.

यावेळी गव्हर्नर शक्तिकांता दास म्हणाले, आर्थिक वर्ष 2023 साठी भारताचा जीडीपी 7 टक्के अंदाजित करण्यात आला आहे. तर 2023-24 या आर्थिक वर्षात महागाईचा दर 4 टक्क्यांच्या वर राहण्याची शक्यता आहे. आरबीआयने एमएसएफ दर 0.25 टक्क्यांनी वाढवून आता 6.75 टक्क्यांपर्यंत नेला आहे. एमएसएफ 6.50 टक्क्यांवरून 6.75 टक्के करण्यात आला आहे

रेपो रेट म्हणजे काय? (RBI Repo Rate)

रेपो रेट म्हणजे तो दर ज्या आधारावर आरबीआयकडून कोणत्याही बँकेला कर्ज दिले जाते. तसेच रिव्हर्स रेपो रेट म्हणजे ज्यावर RBI बँकांना त्यांच्या ठेवींवर व्याज देते तो दर होय. (RBI Repo Rate) आरबीआयचा रेपो रेट वाढल्याने बँकांवर बोजा वाढतो आणि त्यांनतर बँका व्याजदर वाढवून ग्राहकांना भरपाई करून घेतात.