हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI : भारतीय नोटांवर अनेक वर्षांपासून महात्मा गांधींचा फोटो पहायला मिळत आहे. मात्र काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातो आहे की RBI आता नोटांमध्ये मोठा बदल करण्याबाबत विचार करत आहे. यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने एक निवेदन जारी करून त्याचे खंडन केले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले गेले आहे की, सद्यस्थितीत महात्मा गांधींच्या जागी इतरांचा फोटो लावण्याचा कोणताही प्रस्ताव नाही.
RBI आता चलनी नोटांवर डॉ. एपीजे अब्दुल कलाम आणि रवींद्रनाथ टागोर यांचे फोटो वापरण्याचा विचार करत असल्याचा दावा या आधी काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि अर्थ मंत्रालयाने नोटांवर महात्मा गांधींव्यतिरिक्त इतर सेलिब्रेटींचे फोटो लावण्याचा विचार करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही या रिपोर्टमध्ये म्हटले गेले आहे.
There is no such proposal by the Reserve Bank of India to make any changes in the existing currency and bank notes: RBI on reports suggesting that it is considering changes to the existing currency, and bank notes by replacing Mahatma Gandhi's face with that of others pic.twitter.com/DtPL2a8WeS
— ANI (@ANI) June 6, 2022
या मीडिया रिपोर्ट्सनुसार, अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत सिक्योरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (SPMCIL) आणि RBI ने IIT दिल्लीचे एमेरिटस प्रोफेसर दिलीप टी शहानी यांना गांधी, टागोर आणि कलाम यांचे वॉटरमार्क केलेल्या फोटोंचे दोन वेगवेगळे संच पाठवले आहेत. प्राध्यापक शहानी यांना या दोनपैकी एक संच निवडून सरकारसमोर मांडण्यास देखील सांगितले गेले आहे. त्याबाबत एका उच्चस्तरीय बैठकीत अंतिम निर्णय होणार असल्याचेही बोलले जात आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.rbi.org.in/scripts/ic_banknotes.aspx
हे पण वाचा :
Gold Price Today : सोने-चांदीमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Business Idea : अशा प्रकारे फुलांच्या व्यवसायाद्वारे मिळवा भरपूर पैसे !!!
Kapil Dev : ”जेव्हा धावांची गरज असते तेव्हा ते बाद होतात”, रोहित-कोहलीवर भडकले कपिल देव !!!