हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBL Bank : RBI कडून रेपो दरात आतापर्यंत चार वेळा वाढ करण्यात आली आहे. ज्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढण्यास सुरुवात केली आहे. मात्र कर्जावरील व्याजदरात वाढ करण्याबरोबरच बँकांकडून आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरातही वाढ होऊ लागली आहे. यादरम्यानच, आता मुंबईस्थित खाजगी क्षेत्रातील RBL बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमीच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात वाढ केली आहे.
01 नोव्हेंबर 2022 पासून नवीन दर लागू
RBL Bank च्या अधिकृत वेबसाइटवरील माहितीनुसार, हे नवीन दर 01 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहेत. या बदलानंतर आता बँकेकडून ज्येष्ठ नागरिकांना 0.5-0.75% अतिरिक्त व्याज दर दिला जाईल. आता बँकेकडून सर्वसामान्यांना 3.25% ते 7.25% पर्यंत तर ज्येष्ठ सर्वसामान्यांना 3.75% ते 7.75% व्याजदर दिला जाईल.
RBL Bank चे नवीन व्याज दर
RBL Bank आता 725 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 7.25 टक्के व्याज दर देत आहे. तसेच 453 दिवस ते 724 दिवस आणि 726 दिवस ते 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी दर 7 टक्के आहे. 24 महिने ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी दर 6.75 टक्के आहे, तर 36 महिने ते 60 महिने 1 दिवस हा दर 6.55 टक्के आहे. 24 महिने ते 36 महिन्यांपेक्षा कमी कालावधीसाठी दर 6.75 टक्के आहे, तर 36 महिने ते 60 महिने 1 दिवस हा दर 6.55 टक्के आहे.
टॅक्स सेव्हिंग एफडी (60 महिने) चा व्याज दर 6.55 टक्के आहे. RBL बँक 365 ते 452 दिवस (12 महिने ते 15 महिन्यांपेक्षा कमी) कालावधीसाठी 6.50 टक्के तर 60 महिने 2 दिवस ते 240 महिन्यांपर्यंतच्या कालावधीवर 5.75 टक्के ऑफर देत आहे. याशिवाय, बँक 7 दिवस ते 364 दिवसांच्या कालावधीसाठी 3.25 टक्के ते 5.25 टक्के व्याजदर देत आहे.
अनेक बँकांनी FD चे दर वाढवले आहेत
अलीकडेच CSB बँक लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, RBL बँक, Axis बँकेकडूनही आपल्या FD दरांमध्ये वाढ केली गेली आहे. RBI ने रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांकडून ही दर वाढीची प्रक्रिया सुरू झाली आहे.
रेपो रेट गेल्या 3 वर्षांच्या उच्चांकावर
अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.RBL Bank
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.kotak.com/en/personal-banking/deposits/fixed-deposit.html
हे पण वाचा :
EPFO च्या EDLI स्कीमअंतर्गत अशा प्रकारे मिळवा 7 लाख रुपयांचा फ्री इन्शुरन्स
Multibagger Stock : ‘या’ केमिकल स्टॉकने एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला साडेतीन पट रिटर्न !!!
FD Rates : ‘या’ बँका FD वर देत आहेत जास्त रिटर्न, व्याज दर तपासा
आता फक्त एका कॉलमध्ये घरबसल्या अशा प्रकारे अपडेट करा Aadhaar Card !!!
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 100 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे स्टेट्स तपासा