आरसीबीला मोठा धक्का!! ‘या’ आक्रमक खेळाडूला कोरोनाची लागण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेल्या आयपीएल ला काही दिवसच शिल्लक राहिले असताना आता खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. दिल्लीच्या अक्षर पटेल नंतर आता विराट कोहली च्या रॉयल चॅलेंजर बंगळुरू संघाचा आक्रमक सलामीवीर देवदत्त पद्दीकलला कोरोनाची लागण झाली आहे. आरसीबीच्या संघासाठी हा खूप मोठा धक्का आहे.

आरसीबीचा आघाडीचा फलंदाज देवदत्त पडीक्कलचा रिपोर्ट रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. पडीक्कल हा तिसरा आयपीएलमधील क्रिकेटपटू आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सचा अक्षर पटेल याला देखील कोरोनाची लागण झाली होती.

देवदत्त पडिकक्कलने विजय हजारे ट्रॉफीमध्ये यावेळी शानदार प्रदर्शन केले. पडिक्क्कलने 7 सामन्यांत 147.4 च्या सरासरीने 737 धावा केल्या, त्यामध्ये चार शतके आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान आरसीबीचा पहिला सामना बलाढ्य मुंबई इंडियन्सशी असून आरसीबीच्या संघाला हा विजय नक्कीच सोपा नसेल.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like