‘विराट कोहली नाही तर सूर्यकुमार यादव आजच्या सामन्याचा हिरो’, ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूचे वक्तव्य

Surya and virat
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सिडनी : वृत्तसंस्था – टीम इंडियाने आज टी 20 वर्ल्ड कपमध्ये नेदरलँड विरुद्ध सामना जिंकला आहे. टीम इंडियाचा या वर्ल्डकपमधील हा सलग दुसरा विजय आहे. या अगोदर टीम इंडियाने पाकिस्तानवर मात केली होती. नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने 56 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांनी आपले अर्धशतक लगावले आहेत. या तिघांनी मनसोक्त फलंदाजी करत विजयाचा पाया रोवला.

टीम इंडियाची खराब सुरुवात
विराट कोहलीने या वर्ल्ड कपमध्ये सलग दुसरे अर्धशतक केले. त्याने 44 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. याआधी पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद 82 धावांची मॅचविनिंग पारी खेळली होती. या सामन्यात डावाच्या तिसऱ्या ओव्हरला के एल राहुलच्या रूपाने भारताला पहिला धक्का बसला. केएल राहुल 9 धावांवर स्वस्तात बाद झाला.

रोहित- विराटने डाव सावरला
राहुल बाद झाल्यानंतर क्रीजवर आलेल्या विराटने रोहितच्या साथीने मिळून संघाचा डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानात आला. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) आपल्या नेहमीच्या स्टाइलमध्ये चौफेर फटकेबाजी सुरु केली.

बॅटिंगने सर्वांनाच प्रभावित केलं
सूर्यकुमार यादवने या सामन्यात आपल्या नेहमीच्या शैलीत आक्रमक फटकेबाजी केली. त्याने 25 चेंडूत नाबाद 51 धावा फटकावल्या. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. सूर्याने (Suryakumar Yadav) त्याच्या बॅटिंगने सर्वांनाच प्रभावित केलं.

खरा हिरो कोण?
या सामन्यानंतर “खरा हिरो सूर्यकुमार यादव आहे, विराट कोहली नाही. सूर्यामुळे (Suryakumar Yadav) विराट कोहलीवर दबाव राहिला नाही” असे वक्तव्य भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर याने केले. टीम इंडियाने आजच्या सामन्यात पहिली बॅटिंग केली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 2 बाद 179 धावा केल्या. नेदरलँडच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 बाद 123 धावांपर्यंत मजल मारली. आणि भारतानेहा सामना 56 धावांनी जिंकला.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!