हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Recharge Plan : ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन देऊन आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये चांगलीच चढाओढ सुरु आहे. यामुळे ग्राहकांसाठी अनेक चांगल्या रिचार्ज प्लॅन्स उपलब्ध होत आहेत. सध्याच्या महागाईच्या काळात ग्राहकही आपले बजट आणि सोयीनुसार रिचार्ज प्लॅन शोधत असतात. जर आपल्यालाही कमी किंमत असलेला चांगला रिचार्ज प्लॅन हवा असेल तर ही बातमी आपल्यासाठी फायद्याची ठरू शकेल. तर आज आपण Airtel आणि Vi च्या 200 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या प्लॅन्सबाबत जाणून घेणार आहोत.
Vi चे प्लॅन
179 रुपयांचा प्लॅन : Vi च्या या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS, 2GB डेटा आणि 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत Vi Movies आणि TV चे अतिरिक्त फायदे मिळतात.
195 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस, 1 महिन्याच्या व्हॅलिडिटी सहीत 2GB डेटा आणि Vi Movies आणि TV चे अतिरिक्त फायदे मिळतात. Recharge Plan
Airtel चे प्लॅन
155 रुपयांचा प्लॅन : एअरटेलच्या या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत अनलिमिटेड कॉलिंग, 300 एसएमएस, 1GB डेटा आणि HelloTunes सारखे अतिरिक्त फायदे दिले जातात. याशिवाय या प्लॅनमध्ये Wynk Music चे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.
179 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये 24 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत अनलिमिटेड कॉलिंग, 300 SMS, 2GB डेटा आणि HelloTunes चे अतिरिक्त फायदे मिळतात. याशिवाय Wynk Music चे फ्री सबस्क्रिप्शनही उपलब्ध आहे.
209 रुपयांचा प्लॅन : या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 SMS, 21 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत 1GB डेली डेटा आणि HelloTunes चे फायदे आणि Wynk Music चे फ्री सबस्क्रिप्शनही दिले जाते. Recharge Plan
239 रुपयांचा प्लॅन : हा प्लॅन 200 रुपयांपेक्षा थोडा महाग असला तरी यामध्ये 28 दिवसांच्या व्हॅलिडिटी सहीत अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 SMS, 1.5 GB डेली डेटाची ऑफर मिळते. यामध्ये अतिरिक्त लाभ म्हणून फ्री हॅलो ट्यून्स आणि Wynk Music चे फ्री सबस्क्रिप्शनही दिले जाते.
कोणता प्लॅन चांगला ठरेल ???
इथे हे लक्षात घ्या कि, या दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनमध्ये एकसारखेच फायदे मिळतात. यामध्ये एअरटेलचा सुरुवातीचा प्लॅन 155 रुपये तर Vi चा सुरुवातीचा प्लॅन 179 रुपये किमतीमध्ये उपलब्ध आहे. मात्र एअरटेलच्या प्लॅनमध्ये 24 दिवसांची तर Vi च्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. Recharge Plan
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.myvi.in/prepaid/best-prepaid-plans
हे पण वाचा :
HDFC Bank ने ग्राहकांना दिला धक्का !!! आता EMI साठी मोजावे लागणार जास्त पैसे
Redmi Clearance Sale : फक्त 4,499 रुपयांमध्ये घरी आणा Redmi चा ‘हा’ पॉवरफुल फोन
Multibagger Stock : सॉक्स बनवणाऱ्या ‘या’ कंपनीने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 3 पट नफा !!!
Bandhan Bank च्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!!! FD वर मिळणार 8% पर्यंत व्याज
Aadhar Card मधील माहिती अपडेट करण्यासाठी किती खर्च येतो हे जाणून घ्या