हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्या-चांदीचे भाव सातत्याने वाढत आहे. एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्या-चांदीच्या किंमतीत झालेली ही वाढ सोन्यामध्ये गुंतवणूक करणार्यांसाठी ही एक चांगली संधी बनू शकते, मात्र सोन्याची किरकोळ खरेदी करणार्यांसाठी ही चिंतेची बाब ठरू शकते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज अर्थात एमसीएक्सवर सोन्या-चांदीची चमक बरीच वाढली आहे.
सोन्याचे आजचे भाव
आजच्या सोन्याच्या किंमतींकडे नजर टाकल्यास सोने हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. एमसीएक्सवर सोन्याचा वायदा व्यापार जोरात सुरु झाला आहे. आज, ५ जून, २०२० रोजीच्या, सोन्याच्या फ्युचर्स ट्रेडिंगकडे पाहता ते ०.९० टक्क्यांच्या वाढीसह ४८८०८ रुपये १० ग्रॅमसाठी व्यापार करीत आहे.
याशिवाय गोल्ड मिनीची किंमत पाहिल्यास त्यातही तेजी दिसून येत आहे. ५ जून २०२० रोजीच्या गोल्ड मिनीचा फ्युचर्स ट्रेडिंग हा ०.९१ टक्क्यांच्या वाढीसह दर १० ग्रॅमसाठी ४७७८५ रुपयांच्या पातळीवर आहे.
आज चांदीच्या दरामध्येही जोरदार वाढ
आजच्या बाजारात चांदीची दरही बराच वाढलेला आहे. चांदी वायदा बाजारात तेजी नोंदवत आहेत आणि एमसीएक्स चांदीच्या वाढत्या किमतीसह व्यापार करीत आहे. ३ जुलै, २०२० रोजी चांदीच्या फ्युचर्स ट्रेडिंगकडे पाहता ते ३.११ टक्क्यांच्या वाढीसह ४८१४७ रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत आहे.
चांदीच्या दरामध्येही प्रचंड वाढ दिसून येते आहे. ३० जून २०२० रोजीच्या चांदीच्या फ्युचर्स ट्रेडिंगच्या किंमतींकडे नजर टाकल्यास ती ३.१६ % च्या वेगाने व्यापार करत आहे. ३.१६ टक्क्यांच्या वाढीनंतर सिल्व्हर मिनी ४८५५४ रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत आहे.
सोन्याची उसळी कायम राहील
कमोडिटी आणि सराफा बाजारातील तज्ज्ञांच्या मते सोन्याची ही भाव वाढ अधिक काळ चालू राहू शकते. अमेरिकेतून येणाऱ्या नकारात्मक बातम्यांमुळे सध्या डॉलर खाली घसरत आहे आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती वाढत आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.