हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या केंद्रात राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली आहे. तसेच राजदचे नेते लालू प्रसार यादव यांचीही भेट घेत चर्चा केली. यावर यादव यांनी माहिती दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नुकतीच भेट घेतली. त्यांच्या बद्दल सध्या संसद शांत वाटत आहे,” असं यादव म्हणाले.
यावेळी लालू प्रसाद यादव म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व मुलायम सिंह यादव असे आम्ही तिघे खुप वर्ष अनेक मुद्द्यांसाठी राजकीय लढा दिला आहे. मध्यंतरी पवार यांची तब्बेत बरी नव्हती. मी त्यांना भेटण्यासाठी आणि तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. शरद पवारांशिवाय संसद शांत वाटत आहे. सध्या पवार यांची तब्बेत उत्तम आहे. आम्ही भेटलो तेव्हा खूप चर्चाही केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी गेल्या काही दिवसात, अल्पकाळात अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. पवार हे 17 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यापूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना भेटले होते. त्यानंतर वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी शरद पवारांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट झाली होती. जवळपास 57 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली होती. राजधानी दिल्लीत साऊथ ब्लॉकमधल्या पंतप्रधान कार्यालयात दोघांची भेट झाली होती.