रिलेशनशीप |एका जीवाचा दुसऱ्याजीवात जीव बसने म्हणजे प्रेम होणे. दोन मनाचे अतूट मिलन म्हणजे प्रेम होय. अशा प्रेमाच्या व्याख्या केल्या जातात. तुम्ही जर कोणावर खरे प्रेम करत असल आणि तुमचे प्रेम तुम्हाला कायम स्वरूपी टिकवायचे असेल तर तुम्ही खालील गोष्टी टाळल्या पाहिजेत.
कंडोमच्या वापरा संदर्भात तुम्हाला हि माहिती आहे का?
आपल्या जोडीदाराचा विश्वास तोडणे
नात्यात छोट्या छोट्या गोष्टी खूप मोठे परिणाम करून जातात. प्रेमाच्या रिलेशन मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर हि कि तुम्ही तुमच्या जोडीदाराचा विश्वास किती संपादित करता. कारण कोणते हि नाते विश्वासावरच टिकून असते. म्हणून तुमच्या जोडीदाराचा विश्वास तुटेल असं तुम्ही नात्यामध्ये असताना काहीही करू नका.
ठरलं ! या दिवशी सांयकाळी ७ वाजता नरेंद्र मोदी घेणार शपथ
व्यसन करणे
तुम्ही कोणासोबत तरी प्रेमाचे नाते जोपासत असाल आणि ते नाते तुम्हाला आयुष्यभर टिकवायचे असेल तर तुम्ही व्यसन करणे योग्य राहणार नाही. कारण जगात अनेक नाती तुटण्यामागे दारू असल्याचे समोर आले आहे. दारू, सिगारेट , तंबाकू, गुटखा आदी व्यसन नात्यात दरी निर्माण करू शकतात. म्हणून अशा व्यसनापासून दूर राहणेच तुमच्या नात्यासाठी योग्य राहील.
बाप आहे कि उशाचा साप आहे ; बापानेच केला मुलाचा खून
एकापेक्षा अधिक व्यक्ती सोबत रिलेशन ठेवणे टाळा
तुम्ही एका व्यक्ती सोबत रिलेशनमध्ये असाल आणि तुम्हाला त्याच व्यक्ती सोबत लग्न करायचे असेल तर तुम्ही अन्य कोणत्याही व्यक्ती सोबत रिलेशन ठेवू नका. कारण अशी नाती ना लपवता येतात ना लपून राहतात. जेव्हा तुमच्या खऱ्या जोडीदाराला तुमच्या अन्य नात्या बद्दल कळते तेव्हा अपोपच त्या व्यक्तीच्या मनातील तुमच्या प्रतीचे प्रेम आणि आदर एका क्षणात कमी होती. म्हणून अनेक व्यक्तीसोबत रिलेशन ठेवू नका.
एकमेकांना वेळ द्या
धकाधकीच्या जीवनात माणसाला आपले आयुष्य जगायला वेळच पुरत नाही. मात्र तुम्ही जर नाते जपतअसाल तर तुम्ही आपल्या जोडीदाराला वेळ हा दिलाच पाहिजे. कारण वेळ दिला नाही तर तुमचे नाते फुलासारखे कोमेजण्याचा संभव असतो.