केनियामध्ये राज्यपालांनी सॅनिटायझर म्हणून केले वाइनचे वाटप म्हणाले,”कोरोनापासून होईल सुटका”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आतापर्यंत, कोरोनाव्हायरसमुळे जगभरात दीड दशलक्षाहूनही अधिक लोकांचा बळी गेला आहे कारण या आजारासाठी औषध किंवा लस उपलब्ध झलेली नाही आहे.जागतिक आरोग्य संघटना असा अंदाज वर्तवित आहे की या वर्षाच्या अखेरीस कोरोनावर लस तयार होऊ शकते. अशा परिस्थितीत, जेथे कोरोनाव्हायरसवर इलाज असा नाही आहे,मात्र आफ्रिकन देश असलेल्या केनियामध्ये त्यांचा राज्यपाल आपल्या लोकांना समजावून सांगत आहे की अल्कोहोल हे कोरोनाव्हायरसपासून बचाव करू शकते.

केनियाची राजधानी नैरोबीचा राज्यपाल माईक सोनको आपल्या राज्यातील गरिबांमध्ये अन्नाची पाकिटे व मद्याचे वितरण करीत असून त्यास सॅनिटायझर म्हणून वर्णन करीत आहेत.

 

माईक सोनकोचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये त्याने हेनेसीची बाटली फूड पॅकेट्ससह वितरीत करण्याबद्दल बोलत आहे. हेन्सी हे एक प्रकारचे अल्कोहोल आहे. व्हिडिओमध्ये माईक सोनकीने सांगितले आहे की, ‘कोरोनाव्हायरस साथीच्या काळात शहरातील गरीब कुटुंबांना फूड पॅकेटसमवेत हेनसेची छोटी पाकिटे दिली जात आहेत’. कोरोनाव्हायरस किंवा इतर कोणत्याही विषाणूचा नाश करण्यासाठी हे अल्कोहोल खूपच प्रभावी आहे.

जागतिक आरोग्य संघटनेला जेव्हा केनियाच्या राज्यपालांची हि माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्वरित निवेदन काढून हा दावा फेटाळून लावला. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की अल्कोहोलचे सेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे आणि ते शरीराची प्रतिकारशक्ती कमी करते ज्यामुळे एखाद्या व्यक्तीस कोरोनाव्हायरस किंवा इतर सर्व व्हायरसची लागण होऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment