औरंगाबाद | जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या संदर्भात पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सर्व यंत्रणांची जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.
राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट तीव्र होत असून, जिल्ह्यातील वाढीव रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अत्यावश्यक उपचार सुविधांसह सज्ज राहावे, प्रतिबंधात्मक उपाययोजनांद्वारे संसर्गापासून जिल्ह्याचे संरक्षण करावे, जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या आणि अंशतः लॉकडाऊन याबाबत संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या प्रमुखांची आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आली.
यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिक कुमार पाण्डेय, पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता, ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदवणे, शासकीय रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी, मनपा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली.
आज सायंकाळी साडेचार वाजता पालकमंत्री पत्रकार परिषद घेऊन औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार की उपाययोजना अजून कठोर करण्यात येईल याबाबत घोषणा करतील, असे असले तरीही जिल्ह्यात लॉकडाऊन लागणार असल्याच्या चर्चाना पेव फुटले असल्याचे ऐकायला मिळत आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा
Click Here to Join Our WhatsApp Group