RIL AGM 2020: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेत मुकेश अंबानींनी केल्या या १० मोठ्या घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (RIL) वार्षिक सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ही कंपनीची 43 एजीएम होती. विविध व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्सचे जवळपास एक लाखहून अधिक शेअर होल्डर या बैठकीत सामील झाले होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या.

१)Google सोबत कराराची घोषणा
संकटाच्या वेळी मोठ्या संधीही येतात. रिलायंन्स इंडस्ट्री लिमिटेडचा मार्केट कॅप 150 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेली आहे. मुकेश अंबानी यांनी गुगलबरोबर झालेल्या कराराचीही माहिती दिली. जियोमध्ये गुगल 7.7 टक्के समभाग गुंतवणूक करणार आहे. म्हणजेच जियोमध्ये गूगल 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक करेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

२)रिलायन्स 150 बिलियन डॉलर्सची मार्केट कॅप असलेली पहिली भारतीय कंपनी बनली
रिलायन्स 150 बिलियन डॉलर्सची मार्केट कॅप असलेली पहिली भारतीय कंपनी बनली. कोरोना संकटातही भारत आणि जग वेगाने प्रगती करेल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. प्रत्येक संकट आपल्यासोबत अनेक संधी घेऊन येतं.

३)पुढील ३ वर्षात 50 कोटींपेक्षा जास्त जिओ मोबाइलचे ग्राहक असतील
मुकेश अंबानी म्हणाले की, दहा लाखाहून अधिक घरे जिओ फायबरने जोडली गेली आहेत. जिओने 5 जी सोल्यूशन विकसित केले आहे. त्यामुळे तीन वर्षांत 50 कोटींपेक्षा जास्त जिओचे मोबाइल ग्राहक असतील.

४) भारतात जागतिक स्तरीय 5 जी सेवा आणणार
आम्ही भारतात जागतिक स्तरीय 5 जी सेवा आणणार आहोत. आम्ही जागतिक स्तरावर टेलिकॉम ऑपरेटर्सना 5 जी सोल्यूशन देऊ. जिओचा 5 जी सोल्यूशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनसाठी समर्पित आहे.

५) भारताला 2G मुक्त करणार
भारत 5 जी युगाच्या दारात उभा आहे. सध्या 2 जी फोन वापरणार्‍या 35 कोटी भारतीयांना स्वस्त स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न आहे. एजीएममध्ये फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांचा व्हिडिओ संदेशही दाखवण्यात आला.

६) जिओ पुढील ३ वर्षांत अर्धा अब्ज मोबाईल ग्राहक जोडणार
जिओ येत्या तीन वर्षांत अर्धा अब्ज मोबाईल ग्राहकांशी जोडला जाणार आहे. जिओने संपूर्ण 5 जी तंत्रज्ञान विकसित केली आहे. 5 जी स्पेक्ट्रम लवकरच उपलब्ध होणार आहे, त्याच्या चाचण्याही सुरू होतील, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान पुढील वर्षी फिल्डवर वापरण्यासाठी तयार केले जाऊ शकते.

७)जिओ व्हिडीओ मिटिंग अप 50 लाख लोकांनी डाउनलोड केले
50 लोक लोकांनी जिओ मीट अप डाऊनलोड केले आहे. हे व्हिडिओ मीटिंग अॅप नुकतच लॉन्च करण्यात आलं आहे.

८)जिओ डेव्हलपर्स प्रोग्रामच्या मदतीने अॅप डेव्हलपर आपले अॅप डेव्हलप करु शकतील
मुकेश अंबानी यांनी आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि किरण यांना बोलावून कंपन्यांच्या नवीन आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचीही माहिती दिली. यादरम्यान आकाश अंबानी म्हणाले की, जियो डेव्हलपर्स प्रोग्रामच्या मदतीने कोणताही अॅप डेव्हलपर अॅप डेव्हलप करु शकतो, लॉन्च करु शकतो आणि मॉनिटाईज करू शकतो. जियोचे भागीदार बनू इच्छित असलेले अधिक माहितीसाठी http://developer.jio.com वर भेट देऊ शकतात. कोणताही युजर सेट टॉप बॉक्सच्या जिओ अप स्टोअरच्या माध्यमातून मनोरंजन, शिक्षण, आरोग्य, पाककला, योग, गेमिंग, धर्म इत्यादी विविध प्रकारच्या अ‍ॅप्सचा वापर करू शकतो.

९) JioTV+ ची घोषणा
एजीएममध्ये JioTV+ ही सादर केलं. JipTV+ जगातील 12 आघाडीच्या ओटीटी कंपन्यांचा कन्टेंट उपलब्ध असेल. यात Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar, Voot, SonyLiv, Zee5, JioCinema, JioSaavn, YouTube इतर अनेक अ‍ॅप्स आहेत.

१०)जियो प्लॅटफॉर्ममधील एकूण गुंतवणूकीने 2,12,809 कोटी रुपये जमा झाले
जिओ प्लॅटफॉर्म्सने 20 स्टार्टअप भागिदारी सोबत 4 जी, 5 जी, क्लाउड कम्प्यूटिंग, डिव्‍हाइसेस आणि ओएस, बिग डेटा, एआय, एआर/व्हीआर, ब्लॉकचेन, नॅचरल लॅग्वेज अंडरस्टॅडिंग आणि कॉम्प्युटर व्हिजन यासारख्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. आरआयएलने राइट्स इश्यू, जिओ प्लॅटफॉर्ममधील एकूण गुंतवणूक आणि बीपीद्वारे केलेली गुंतवणूक यांच्या माध्यमातून एकूण 2,12,809 कोटी रुपये उभे केले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment