शिवीगाळ करीत महिलांशी लगट करणारे दोघे रोमिओ गजाआड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | घरा समोर गप्पा मारत उभ्या असणाऱ्या महिलांशी पूर्व वैमनस्यातून शिवीगाळ व लगट करुन त्यांचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री वडगाव कोल्हाटी परिसात घडली. गणेश नवनाथ सोमासे (वय २०) आणि शुभम परसराम लघाणे (वय २२, दोघे रा. वडगाव कोल्हाटी) या दोघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी गजाआड केले आहे.

वरील प्रकरणात ४० वर्षीय महिलेने फिर्याद दिली की, दि. ६ मार्च रोजी फिर्यादी व त्यांच्या तीन जाऊ परिसरात हळदीचा कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रम आटोपून त्या सर्व घरासमोर गप्पा मारत उभ्या असतांना तेथे आरोपी अक्षय शिंदे, गणेश सोमासे, शुभम लघाणे, शुभम जाधव आणि निलेश काळे असे दुचाकीवर आले. त्यांनी दुचाकी फिर्यादीच्या समोर उभ्या करुन त्यांना शिवीगाळ करु लागले. त्यामुळे फिर्यादीने त्यांना समजावून सांगत असतांना आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली.

आरोपी शुभम लघाणे याने फिर्यादीशी तर गणेश सोमासे याने फिर्यादीच्या जाऊचा हात पकडून छेडछाड करुन विनयभंग केला. प्रकरणात एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.