हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांच्यावरील टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी ट्वीटद्वार संताप व्यक्त केला आहे. “डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्यामुळे साताऱ्यात अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला. त्या ठिकाणी भाजपा प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे. महाराष्ट्राचा व या कायद्याचा अवमान करणारी आहे,”असे पवारांनी म्हंटले आहे.
बावनकुळेंनी शरद पवारांबाबत केलेल्या विधानानंतर रोहीत पवारांनी ट्विटद्वारे बावनकुळेंवर निशाना साधला आहे. त्यांनी बावनकुळेंचा पत्रकार परिषदेतील फोटो आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकरांचा फोटो पोस्ट करत प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आता याबाबत राज्य सरकार काय करतं याकडं सर्वांचं लक्ष लागलंय! राज्यातले प्रकल्प गुजरातला नेऊन प्रगतीच्या बाबतीत महाराष्ट्राला मागं आणण्याचा प्रयत्न तर भाजपकडून सातत्याने होतच आहे, पण विचारांच्या बाबतीतही महाराष्ट्राला मागं आणण्याचा त्यांचा डाव स्पष्ट दिसतोय. pic.twitter.com/BD5TLHHpwQ
— Rohit Pawar (@RRPSpeaks) November 11, 2022
“अंधश्रद्धा व जादूटोणाविरोधी कायदा ज्यांच्यामुळे संमत झाला त्या डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या साताऱ्यात भाजपा प्रदेशाध्यक्षांची जादूटोण्याची भाषा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी आणि महाराष्ट्राचा व या कायद्याचा अवमान करणारी आहे. शिवाय जादूटोणाविरोधी कायद्यालाच हे आव्हान आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
जितेंद्र आव्हाड यांना पोलिसांकडून अटक
वाचा सविस्तर – 👇👇👇https://t.co/gJWSytf5Z6#hellomaharashtra @Awhadspeaks
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 11, 2022
चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले?
सातारा येथील पत्रकार परिषदेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांनी जादूटोणा केल्याने उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेससह गेले.