Wednesday, February 1, 2023

पवारांवर टीका करणाऱ्या बावनकुळेंवर राऊत बरसले; म्हणाले,आपलं कर्तृत्त्व…

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे जादूटोणा करणारे भोंदूबाबा आहेत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती . त्यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला आहे. पवारांवर टीका करणाऱ्यांनी आपलं कर्तृत्त्व काय आहे हे लक्षात घ्यावं असं त्यांनी म्हंटल आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून लक्ष्य आकर्षित करत हे भाजपच्या लोकांचे काम झालं असेल तर याचा अर्थ ते स्वतःच्या कार्यावर उभे नाहीत. शरद पवार महाराष्ट्राचे प्रमुख नेते आहेत याच भान त्यांनी समजून घेतलं पाहिले. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यापूर्वी आपलं कर्तृत्त्व काय आहे हे त्यांनी समजून घ्याव. फक्त आपल्या हातात सत्ता आहे म्हणून जर तुम्ही आमच्या नेत्यांवर टीका करत असाल तर आम्ही पण आहोत असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?

सातारा येथील पत्रकार परिषदेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार हे जादूटोणा करणारे भोंदूबाबा आहेत . शरद पवारांनी जादूटोणा केल्याने उद्धव ठाकरे फसले आणि विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेससह गेले. शरद पवारांच्या संपर्कात कोणी आलं तर तो सूटत नाही. असे सांगून शरद पवार भोंदूबाबा आहे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. राष्ट्रवादीचे घड्याळ बारामतीमध्ये बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे असा इशाराही त्यांनी दिला.